
मुंबई :- आमदार राम कदम हे सतत काही ना काही तर वक्तव्य करून उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र डागत असतात.अशात आता त्यांना एक दावा केलाय.त्यांनी आपल्या सोशल मिडीयावरून एक व्हिडीओ शेअर करत, ‘उध्दव ठाकरे यांच्या दलाचे उरले-सुरलेले नेते, आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणाऱ्या शिवसेनेत सामील होतील’,असा दावा भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
उध्दव ठाकरे यांच्या गटातील नेते शिंदेंकडे जातील या भीतीपोटी उबाठाचे काही नेते खोटी भविष्यवाणी करत आहेत.
उबाठामधील नेते दर पंधरा दिवसांनी भविष्यवाणी करतात आणि तोंडावर पडतात. उबाठाचे नेते महाराष्ट्रातील जनतेला मुर्ख समजत आहेत का ? अशा शब्दात राम कदम यांनी खासदार सजंय राऊत यांच्यावर टिकास्त्र डागलं.दरम्यान, उरले सुरलेले सगळे नेते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिवसेनेत येतील आणि काही नेते हे भाजपमध्ये प्रवेश करतील,अशी भविष्यवाणी देखील आमदार राम कदम यांनी केली आहे.