जालना– गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु व्हावा या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या शेवगळ येथील ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून वीरू स्टाईल आंदोलन केले आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर उन्हामुळे आटली आहे. त्याचबरोबर परिसरात इतर कोणतेही पाण्याचे स्त्रोत नाही.
त्याचबरोबर उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गावपरिसराती आजूबाजूच्या विहिरी देखील आटत चालल्या आहेत. त्यामुळे गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. त्यासाठी गावात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन विहीर आणि जलकुंभाला मंजुरी द्यावी. त्यासह सद्यस्थितीत पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावात तातडीने पाण्याचे टँकर सुरु करावेत, यासाठी गावकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे. या आंदोलनासह त्वरीत पाणीटँकर सुरु करावे अशी विनंती ग्रामस्थांनी प्रशासनाला केली आहे.