रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रटीकरण करण्याची सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले यांची मागणी….


विलेपार्ले – मुंबई महानगरपालिका के ईस्ट वार्ड मधील विले पार्ले विभागातील वार्ड क्रमांक ८३ अंतर्गत येणाऱ्या न्या.छगला रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून सदर रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी तातडीने काॅंक्रिंटीकरण करावे . रस्त्याच्या दुतर्फा किंवा एक बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार लाइन् काढल्यास रस्ता नक्की टिकू शकेल अशी मागणी विभागातील सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले यांनी केली आहे




. विलेपार्ले पूर्वेकडील डोमेस्टिक एअर पोर्ट जवळील विले पार्ले पोलीस स्टेशन ,संजय गांधी नगर आंबेवाडी, आनंद चाळ कमिटी,संभाजी नगर,आंबेडकर नगर ,सम्राट अशोक नगर,महात्मा फुले नगर,वाल्मिकी नगर ते बामणवाडा पर्यंतचा परीसर झोपडपट्टीचा असून येथील रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे शालेय विद्यार्थी,जेष्ठ नागरिक आणि गरोदर महिला यांना देखील खूप त्रास् सहन करावा लागतो, पावसाळयात तर वाहनांच्या ये जा मुळे पायी चालणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या कपड्यावर रस्त्यावरील पाणी देखील उडत असते, आता उन्हाळयात ही परिस्थिती आहे तर पावसाळ्यात किती भयंकर परिस्थिती असेल याचा विचार करून प्रशासनाने सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी करावे असे आवाहन श्री गोरुले यांनी जनतेच्या वतीने केले आहे