अमरावती – काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.यावेळी सावरकरांची जयंती साजरी करत असताना सदनातील जीन्याच्या बाजूला उभारण्यात आलेल्या सावित्रीमाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले होते.या प्रकारामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र डागलं जात असून राज्यात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा कलगीतुरा रंगल्याचं देखील पाहायला मिळत आहे.
अशात काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपचा निषेध नोंदवला आहे.यशोमती ठाकूर म्हणाल्या,’त्यांना पुरोगामी विचारांना मारून टाकायचे आहे. ते पुरोगामी विचारांना मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे लोकशाहीच्या मंदिराचा उद्घाटन करत असताना दिल्लीतील आंदोलन मोडीस काढत आहेत याचा मी निषेध करते, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.
अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला पाहिजे हा आमचा अट्टाहास आहे. अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचे प्रभुत्व आहे. त्यामुळे अमरावती मतदारसंघ काँग्रेसने जिंकला पाहिजे सुटला पाहिजे, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.