🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 (रत्नागिरी | जानेवारी २९, २०२३)
▪️ भारत शिक्षण मंडळाच्या देव,घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात नागरी संरक्षण दल रत्नागिरी आणि महाविद्यालय आय.क्यू.ए.सी. विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून नागरी संरक्षण दल सहाय्यक उपनियंत्रक लहू माळगावी, मिलिंद जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी उपस्थित होते.
▪️ पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना नागरी संरक्षण दलाची आवश्यकता, उद्देश, उपाय योजना, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, प्रथमोपचार, नियंत्रण व संदेशवहन, अडकलेल्या नागरीकांची सुटका, सीपीआर, कृत्रिम श्वसन, बॅन्डेज आदी विविध विषयांवर मार्गदर्शन व प्रात्यक्षिकही घेण्यात आले. प्रशिक्षण महाविद्यालयातील एकूण २७ विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. प्रशिक्षण शिबिराचा समारोप नुकताच करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख सौ. ऋतुजा भोवड, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.