
संगमेश्वर – (मकरंद सुर्वे संगमेश्वर )
कोकण रेल्वे महामार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक म्हणजे संगमेश्वर रोड. या स्थानकातून हजारो प्रवासी प्रवास करतात. तसेच संगमेश्वर रेल्वे स्टेशन मधून कोकण रेल्वेला ह्या वर्षी 4 करोड 93 लाख कोटीच्या घरात उत्पन्न मिळूनही सुविधा मात्र शून्य.
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वरील पाणपोईंना नळ असून त्याला पाणीच नाही. यासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाला वारंवार सांगूनही जाग येत नाही. आता कडक उन्हाळा सुरू झाला असून परतीच्या प्रवाशी वर्गाला उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत.

ह्या बाबत स्टेशन मास्तरांशी ह्या लक्षात आणून देण्यात आली आहे. तरी त्यावर कोणतीच उपाययोजना केली जात नाही. अशा अवस्थेत प्रवाशांचे पाण्याविना हाल निश्चित होत आहेत. तरी कोकण रेल्वेचे अधिकारी याची दखल कधी घेणार? का नेहमीप्रमाणेच संगमेश्वर रेल्वे प्रवाश्यांना वार्यावर सोडणार?, असा सवाल पत्रकार संदेश जिमन यांनी व्यक्त केला.