मुंबई:- शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्यातील सरकारी शाळांमधील गणवेशाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यंदाच्या वर्षीपासून राज्यात ‘एक राज्य एक गणवेश’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पने अंतर्गत राज्यातील सरकारी शाळांमध्ये एकाच स्वरूपाचा गणवेश सर्वांना परिधान करणे बंधनकारक असेल.
दरम्यान ज्या शाळांनी गणवेशाची ऑर्डर आधीच दिली आहे. त्या शाळांना पहिले तीन दिवस त्याच गणवेशाचे मुभा असेल. ही संकल्पना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. यापुढे राज्यातील प्रत्येक सरकारी शाळांमधील विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.
शाळा सुरू होण्यासाठी आता जेमतेम तीन आठवडे उरले असताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय घेतल्याने शाळा व्यवस्थापन देखील गोंधळात पडले आहे. काही शाळांनी गणवेशाची आगाऊ ऑर्डर दिल्याने शाळा व्यवस्थापन संभ्रमात पडले आहे. दरम्यान, गणवेशाची दिलेली ऑर्डर ही रद्द न करता शाळेचे पहिले तीन दिवस विद्यार्थ्यांना जुना गणवेश घालण्यास मुभा राहील असं देखील दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं.तसंच संबंधित संकल्पना ही फक्त सरकारी शाळांसाठीच असून खासगी शाळांवर याबाबतची कोणतीही बंधनं नसतील.