मुंबई- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या ‘ने मजसी ने’ व ‘जयोस्तुते’ या दोन काव्यरचना शालेय अभ्यासक्रमात सामाविष्ट कराव्यात अश्या सुचना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी केल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणाऱ्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’वितरण सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी बोलताना, राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर या गावी त्यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी इच्छा देखील बोलून दाखवली.
दरम्यान या पुरस्कार सोहळ्यामध्ये यंदाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर देण्यात आला. मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई वीरमाता ज्योती राणे यांनी हा पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून स्वीकारला.
याच पुरस्कार सोहळ्यात बोलताना राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांना समजावे यासाठी त्यांनी केलेल्या काव्याची रचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जावी अशी सुचना केली. याचसोबत सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या भगूर या गावी त्यांचं स्मारक व्हावं अशी देखील इच्छा व्यक्त केली.