
मुंबई- राज्यातील आगामी निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे असा अंदाज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. कर्नाटकात भाजप विरोधी निकाल लागल्याने राज्यातील आगामी निवडणूका लांबणीवर पडू शकतात असं मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केलं.
कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेतून पायउतार करत कॉग्रेसने सत्ताकारणावर आपली मोहोर उमटवली.दरम्यान हा पराभव भाजप पक्षाच्या जिव्हारी लागणारा असल्याने मतदारांचा कौल बदलण्यासाठी निवडणुका लांबणीवर पडू शकतात,असं भाकित शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान दुसरीकडे सप्टेंबर-ऑक्टोबरपासून महानगरपालिकेच्या निवडणूकांचं बिगूल वाजू शकेल अशी शक्यता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांनी वर्तवली आहे. त्यामुळे आगामी निवडणूकांबाबत असलेली अनिश्चितता कधी संपेल याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.