
मुंबई – (शांताराम गुडेकर).
सर्व शिक्षण अभियान भारत सरकार प्रणित केंद्रीय शिक्षण विकास संसद समितीचेअरमन श्री.राजेंद्र मुनोद यांच्या आदेशाने केंद्रीय शिक्षण विकास संसद समितीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी अल्पसंख्यांक आयोग दिल्ली,भारत सरकारचे सल्लागार सदस्य श्री.अविनाश सकुंडे व राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख पदी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांची नेमणूक करण्यात आली.त्याबद्द्ल शिवसेना प्रणित (उध्वजी बाळासाहेब ठाकरे)मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेचावतिने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मायेची सावली एकहात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत खोपकर,संचालक श्री.सदाशिव लाड़,सचिव प्रमोद चौडकर,खजिनंदार श्री. संदीप चांदिवडे,कार्यकारणी सदस्य श्री.राजेन्द्र पेडणेकर. तसेच श्री अनंत मंगल सस्थेचे संस्थापक अध्यक्ष व समाज सेविका सौ जयश्री माई सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.