
दिवा : प्रतिनिधी ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समितीअंतर्गत क्षेत्रात सध्या अपुरा पाणी पुरवठा,नाले सफाई, गटारातील पाणी निचरा व्यवस्था अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर आज ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर साहेब यांची भेट घेऊन यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
दिवा रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा देखील यावेळी उपस्थित केला. मा.आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच दिवा शहराचा दौरा करणार असल्याचे सांगितले. तसेच आठवडाभरात सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, विभाग अध्यक्ष शरद पाटील यांसह अधिकारी देखील उपस्थित होते.
जाहिरात
