
रत्नागिरी ,19 मे 2023-
“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा उदयोग केंद्र यांच्या संयुक्त विदयमाने “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” बुधवार,दि.24 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे.
पूर्वी हा मेळावा मंगळवार, दि.23 मे 2023 रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले होते. परंतु आता हा मेळावा बुधवार, दि.24 मे 2023 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी श्रीम. इनुजा शेख यांनी कळविले आहे.
या रोजगार मेळाव्याकरिता विविध खाजगी आस्थापनाकडून 500 हून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यात आलेली आहे. तरी पुढील शैक्षणिक 10 वी/12 वी / पदवीधर/आय.टी.आय / इंजिनिअर व इतर या शैक्षणिक पात्रतेसाठी योजनेचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा.
रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता बायोडेटा व इतर कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तरी बुधवार, दि.24 मे 2023 रोजी आयोजित या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02352- 221478 / 299385 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी श्रीम. इनुजा शेख यांनी केले आहे.