देवरूख – संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे येथील ट्रॅव्हल्स अपघातामधील १९ जखमींना रत्नागिरी सिव्हील येथे १०८ रुग्णवाहिकेतून हलविण्यात आले आहे. अशी माहिती १०८ चे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक विशाल पवार यांनी दिली आहे.
घटनास्थळी चार 108 रुग्णवाहिका दाखल झाल्या असून, काही रुग्णांना देवरुख ग्रामीण रु्णालयामध्ये दाखल केले आहे व गंभीर दुखापत असणाऱ्या 19 रूग्णांना पुढील उपचरासाठी रत्नागिरी सिव्हील येथे पाठविण्यात आले आहे.