
वरील कृत्यामुळे भारतातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे जिल्ह्यात, राज्यात आणि देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
नाशिक ,16 मे 2023- श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात (Shri Trimbakeshwar Temple) मुसलमानांनी स्थानिक संदल निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी मंदिरात जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले आणि तेव्हा वाद निर्माण झाला. यानंतर या विषयावर राज्यभर चर्चा सुरू झाली. मंदिर प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पत्र लिहिले. ज्यामध्ये मुसलमानांचा मंदिरात घुसण्याचा प्रयत्न हा सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी होता, असा आरोप केला आहे.
या सर्व प्रकारची दाखल राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. (Shri Trimbakeshwar )
ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची घटना घडली होती. (Shri Trimbakeshwar Temple)