
मुंबई – कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुबोध कुमार जायस्वाल यांचा कार्यकाळ संपल्यामुळं गृहमंत्रालयाने प्रवीण सूद यांची संचालकपदी नियुक्ती केली आहे. भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवालचे सासरे प्रवीण सूद हे CBI चे नवे संचालक बनले आहेत. याआधी ते कर्नाटकचे डीजीपी राहिले आहेत. आता ते दोन वर्षांसाठी सीबीआयचे संचालक असतील, ते 25 मे रोजी पदभार स्वीकारतील.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे पाठवण्यात आलेली निवडलेली नावामध्ये प्रवीण सूद यांच्यासह सुधीर कुमार सक्सेना, (डीजीपी, मध्य प्रदेश) आणि ताज हसन (महासंचालक, अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक) यांचा समावेश होता.