
ऐतिहासिक वारसा असलेल्या संगमेश्वर परिसराला पर्यटकांनी भेट देऊन प्राचीन इतिहास समजून घ्यावा… मा. पोलीस अधीक्षक कुलकर्णी साहेब यांचे प्रतिपादन…..

संगमेश्वर :-
प्राचीन व ऐतिहासिक वारसा असलेल्या संगमेश्वर परिसराला रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. श्री धनंजय कुलकर्णी साहेब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६६ व्या जयंती निमित्त संगमेश्वर कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे भेट देऊन महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर परिसरातील सरदेसाई वाडा, प्राचीन मंदिरे व प्रसिद्ध करणेश्वर मंदिराला भेट दिली व तेथील शिवप्रेमी प्रवीण चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बोरसूतकर गुरुजी व ग्रामस्थ मंडळीकडून परिसराची माहिती समजून घेतली.

मा. अधीक्षक साहेब यांना लेखक आशुतोष बापट यांचे “सफर संगमेश्वर देवरुख परिसराची” हे पुस्तकं कोंड असुर्डेचे मा. सरपंच पत्रकार श्रीराम शिंदे, संगमेश्वर मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष मज्जीद भाई नेवरेकर, प्रवीण चव्हाण, भाई पेंढारी, इलियाज मापारी व संगमेश्वर पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख साहेब यांच्या वतीने देण्यात आले.

मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी ग्रामस्थ यांना थोडया दिवसात मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे कार्यालयात संगमेश्वर परिसरातील ऐतिहासिक व प्राचीन मंदिरे व पर्यटनच्या दृष्टीने योग्य त्या उपाय योजना संदर्भात बैठक लावून मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले या वेळी मा. सभापती बंडयाशेठ महाडिक, कसबा सरपंच पूजा लाने, ग्रा.प. सदस्य प्रवीण चव्हाण, ग्रा.प. सदस्य भाई पेंढारी, ग्रा. सदस्य. इलियाज मापारी, सामाजिक कार्यकर्ते बोरसुतकर गुरुजी, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्तिथ होते….