विजयाची चाहुल लागताच काँग्रेस अलर्ट, मतमोजणी केंद्रातून करणार…

Spread the love

आमदारांचं एअरलिफ्ट; 15 हेलिकॉप्टर सज्ज

कर्नाटक ,बेंगलोर- ,13 मे 2023 – एकदा जर ठेस लागली तर आपण पुढचं पाऊल सावधपणे टाकत असतो. अशीच काही काँग्रेसची सध्याची स्थिती आहे. कर्नाटकचा निकाल ( Karnatak Result ) आता समोर आला आहे. काँग्रेस सत्तास्थापनेच्या दिशेने पाऊल टाकत आहे. त्यामुळे आता बैठकांचा सपाटा सुरु झाला आहे. कोणताही धगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल असा ट्रेंड आहे. काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत ऑपरेशन लोटस यशस्वी होऊ द्यायचे नाही. सत्तेच्या जवळ असूनही काँग्रेसला यश मिळू शकलेली नाही, अशी देशातील अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे काँग्रेस अलर्ट झालं आहे.

काँग्रेसच्या विजयाची शक्यता निर्माण होताच हायकमांड पूर्णपणे सक्रिय झालं आहे. काँग्रेसच्या आमदारांना आजच बंगळुरूला पोहोचण्यास सांगितले आहे. आमदारांना एकत्र करण्यासाठी विविध ठिकाणांहून काँग्रेस आमदारांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानकेंद्रातूनच आमदारांना थेट मुख्यालयात नेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपला त्यांच्याशी अजिबात संपर्क साधता येणार नाही. मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तैनात आहेत. एकही आमदार कोणत्याही परिस्थितीत तुटू नये यासाठी काँग्रेसची संपूर्ण योजना आधीच तयार आहे.

काँग्रेसचे ऑपरेशन हस्त

गोवा असो की उत्तराखंड किंवा कर्नाटक. ऑपरेशन लोटसचा फटका काँग्रेसला बसला आहे. यावेळी काँग्रेसने आधीच तयारी केली होती. या ऑपरेशनला हस्त असे नाव देण्यात आले होते. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याची संपूर्ण रणनीती आखली होती. खर्गे हे कर्नाटकमधून येतात. त्यामुळेच पक्षाने संपूर्ण जबाबदारी खर्गे यांच्यावर सोपवली होती. यासाठी दिग्गज नेत्यांची फौज तैनात करण्यात आली होती. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार, बीके हरिप्रसाद यांसारखे नेते ऑपरेशन हस्तासाठी पूर्णपणे तयार आहेत.

ऑपरेशन लोटस म्हणजे काय?

ऑपरेशन लोटसचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला होता. जेव्हा-जेव्हा एखाद्या राज्यात निवडणुका होतात आणि विजय-पराजय यात थोडाफार फरक असतो, तेव्हा तिथून भाजपची योजना सुरू होते. हेलपाटे मारून सरकार स्थापन करण्यात भाजप तरबेज आहे. आपल्या छावणीत इतर आमदारांना सामील करून सरकार बनवते. खुद्द कर्नाटकातही ऑपरेशन लोटस राबवले होते. काँग्रेस आणि जेडीएस सरकार पाडून भाजपने कर्नाटकात सरकार स्थापन केले होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page