
▶️ रत्नागिरी ,10 मे 2023-
खाली दिलेल्या व्यक्ती हरविलेल्या आहेत, सदर व्यक्तींबाबत माहिती समजल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महेश कृष्णा हंबीर – वय वर्षे 38 राहणार कळंबणी बुद्रुक ता. खेड जि. रत्नागिरी येथून 29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान मौजे कळंबणी बुद्रुक येथून नापता झाले आहेत. हरविलेल्या व्यक्तीची उंची 5 फूट 8 इंच, रंग सावळा,अंगाने मजबूत, अंगामध्ये लाल रंगाचा टीशर्ट असून नेसणीस मरुन रंगाची फुल पॅन्ट आहे. मिशी मध्यम राखलेली आहे. केस वाढलेले असून पायामध्ये चप्पल आहे. सोबत मोबाईल हँडसेट असून जीओ कंपनीचा सीमकार्ड नंबर 8779063224 असा आहे. तरी सदर व्यक्ती आढळल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ खेड पोलीस ठाणे यांना द्यावी.
शहनाज मुबारक फणसोपकर – वय 24 वर्षे राहणार घर नं. 212 जुना फणसोप ता. जि. रत्नागिरी ही व्यक्ती 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 8.45 ते 9.45 वाजता दरम्याने घर नं. 212 जुना फणसोप ता. जि. रत्नागिरी येथून नापता झाली आहे. नापता व्यक्तीची उंची 5 फूट 2 इंच, नाक सरळ, नेसणीस पिवळ्या रंगाचा टॉप, निळ्या रंगाची सलवार, लाल रंगाचा स्टोल, काळ्या रंगाचा बुरखा, अंगाने सडपातळ, रंग गोरा, केस लांब, कानात सोन्याचे चेनसह झुमके, पायात साधी चप्पल, दोन्ही हातात हिरव्या बांगड्या व दोन सोन्याच्या बांगड्या, उजव्या व डाव्या हातात दोन सोन्याच्या अंगठ्या, शिक्षण नाही असे आहे. तरी सदर व्यक्ती आढळल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांना द्यावी.
यशवंत लक्ष्मण देवळे – वय 55 वर्षे रा. अडूर भाटलेवाडी ता. गुहागर जि. रत्नागिरी हे 16 डिसेंबर 2007 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अडूर भाटलेवाडी ता. गुहागर जि. रत्नागिरी येथून नापता झाले आहेत. नापता व्यक्तीचे उंची 5 फूट 5 इंच, रंग काळा सावळा, चेहरा गोल, नाक बारके, डोळे काळे, केस पिकलेले, नेसणीस खाकी हाफ पँट, अंगात सफेद रंगाचा हाफ शर्ट, दारु पिण्याची व तंबाखू खाण्याची सवय आहे. तरी सदर व्यक्ती आढळल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ गुहागर पोलीस ठाणे यांना द्यावी.