भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड

Spread the love

गुहागर ,प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची महाराष्ट्र शासना कडून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी गुहागर व उत्तर रत्नागिरी भारतीय जनता पार्टी कडून त्यांचे निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले .

निलेश सुर्वे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आहे त्याने केलेला कामाचे पोचपावती म्हणून सदरची निवड करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार केली आहे. तसेच वेळोवेळी निवडणुकीमध्ये पक्षासाठी यांच्या संघटन कौशल्य दिसले आहे.
त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करून मोठे पद देवून गौरविण्यात आले आहे.

त्याच्या निवडीने भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पदाचा वापर जनसामान्यांची अनेक कामे मार्गी लावत भारतीय जनता पार्टी चा झेंडा अटकेपार नेत संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत गुहागर पंचायत समिती व नगर पंचायतीवर पुन्हा भाजप- सेना युतीचा भगवा फडकविणेचा निर्धार निलेश सुर्वे यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी शुभेच्छा देताना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत इलेक्शन साठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीसाठी याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.

या निवडीबद्दल त्याचे माजी आम. व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य विनयजी नातू , केदार साठे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी , नागेश धाडवे , जिल्हा सरचिटणीस भाजपा , संतोष जैतापकर ओबीसी, भाजपा जिल्हाध्यक्ष उत्तर रत्नागिरी , रामदास कदम मा.मंत्री व शिंदे गट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ,माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, भाजपचे चिपळूण भाजपा तालुकाध्यक्ष ताम्हणकर , भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सह त्यांच्या मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page