चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई काहीसातच दुचाकी चोराला केली अटक….

Spread the love

चिपळूण- चिपळूण मधून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात चिपळूण पोलिसांना यश आले असून या दोन दुचाकी चोरणारा एकच चोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या आरोपीला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे.सोमवारी अजय कृष्णा कदम या आरोपीला चिपळूण न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील एक दुचाकी रवीवारी दुपारी चोरीला गेली होती चिपळूण पोलिसांनी काही तासातच त्याच दिवशी गस्त घालत असताना पाग येथे रविवार दिनांक ७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता चित्तथराराक पाठलाग करून ही दुचाकी चालवणारा आरोपीला ताब्यात घेतले पुढे तपासात याच आरोपी कडून अन्य दुचाकी चोरी बद्दल माहिती उघड होण्याची दाट शक्यता असून एक महिन्यापूर्वी चोरीला गेलेली दुचाकी याच आरोपीने चोरल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी पोलीस युद्धपातळीवर तपास करीत आहेत.चिपळूण पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून धडाकेबाज कामगिरीमुळे दुचाकी चोरांना चांगलाच आळा बसणार आहे.

  समीर रामकृष्ण चिखले रां.खेंड गणेश मंदिर जवळ चिपळूण यांनी रवीवारी चिपळूण पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार चिखले यांनी खेंड येथील केतकर घरासमोर रविवारी सकाळी लावलेली दुचाकी स्प्लेंडर MH 08 M 7624 ही याच जागी सायंकाळी येथून चोरून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरून त्यांनी तक्रार नोंदविली.या आधारे चिपळूण पोलीस पाग येथे गस्त घालत असताना

रविवारी सायंकाळी आरोपी अजय कृष्णा कदम वय २२ रा.रोहिदासवाडी वेहेळे सध्या रा.कापरे याला चिपळूण पोलिसांनी सदर चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून चिखले यांची दुचाकी ताब्यात घेतली व त्याला अटक केले.याच आरोपीकडून चौकशी केली असता दुसरी दुचाकी मीच चोरली असल्याचे त्याने कबूल केले आहे. या आधारे दुसरी दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

इस्माईल मोहम्मद चौगुले रा. गोवळकोट यांच्या मालकीची MH 08 Y 6133 स्प्लेंडर गाडी नाईक कंपनी बाजार पुल येथे दि.४.४.२०२३ रोजी सकाळी ७.३० वा. लावलेली पुन्हा दुपारी २ वा दरम्यान घ्यायला गेले असता येथून चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकाचे पो.हे. कॉ विनोद आंबेरकर ,पो.हे. कॉ अजित कदम,पो.ना महेश चीले तपास करीत आहेत तर चिखले यांच्या दुचाकी चोरीचा तपास पो.ना संदीप
माणके हे करीत आहेत.पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे वृशाल शेटकर ,पो.ना संदीप माणके,पो. कॉ प्रमोद कदम,पो. हे.कॉ अतुल ठाकुर,पो. कॉ. राकेश जाधव यांनी या तपास कार्यात विशेष मेहनत घेऊन आरोपीला अटक केली आहे. रजि नंबर ११२ अन्वये २०२३ आयपीसी ३७९ नुसार कारवाई करण्यात आली आहे.सोमवारी या आरोपीला चिपळूण न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page