
ग्रामपंचायतच्या अंदाधुंद कारभाराविरोधात असता आंदोलन करणार..
देवरुख- मु. पो. पूर्ये तर्फे देवळे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील जांभवाडीच्या रस्त्याला जागेमालक यांच्या संमती पत्राविना २३ नंबरला नोंद कशी घालण्यात आली. याची चौकशी करण्याचे पत्र ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिले होते. परंतु या पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
ग्रामस्थांनाही चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेले नाही.

दिनांक ०४/०४/२०२३ रोजी ग्रामपंचायत पूर्ये तर्फे देवळे यांच्याकडे सदर विषयाबाबत जागेमलक यांच्या संमती पत्रासह २३ नंबरला नोंद असलेली प्रत, वर्क ऑर्डर व इस्टिमेट ची प्रत मिळावी याबाबत पत्रव्यवहार केलेला होता.
तसेच ज्या ठिकाणी संरक्षण भिंतीची गरज होती, त्या ठिकाणी संरक्षण भिंत न बांधता पडीत जागेत बांधण्यात आलेली आहे.

त्यामुळे मागणीनुसार ग्रामसेवक विशाल कांबळे यांच्याकडून इस्टिमेट, वर्क ऑर्डर व १९९२ ची फक्त कागदोपत्री केलेली २३ नंबरची नोंद व्हाट्सअप द्वारे देण्यात आली. मात्र जागेमालक वासुदेव गुरव, आग्रे, सनगले व गोरुले यांचे संमती पत्र देण्यात आलेले नाही.
ग्रामस्थांचा संशय आहे की १९९२ ची २३ नंबरला ग्रामपंचायत मधील कागदोपत्री असलेली नोंद ही बेकायदेशीर आहे.* त्यासाठी जमीन मालक यांचे संमतीपत्र घेण्यात आलेले नाही जागे मालक यांच्या संमतीपत्रविना बेकायदेशीर केलेल्या २३ नंबरच्या रस्त्यावर उपसरपंच श्री. संजीव चव्हाण यांनी जनसुविधा अंतर्गत आलेला दहा लाखाचा शासकीय निधी व गटर बांधणीसाठी ग्रामपंचायत मधील जमा असलेला अतिरिक्त एक लाखाचा निधी कसा काय टाकला? याची चौकशी व्हावी. अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत इला असे सांगण्यात आले की जांभवाडीतील रस्त्याच्या विकासाला आमचा कोणताही विरोध नसून, सदर रस्ता हा अर्जातील नमूद जागेमालक यांच्या संमती पत्रासह २३ नंबर ला नोंद घालूनच करण्यात यावा.* अशी योग्य मागणी ग्रामस्थांचे असताना सदरचे काम करण्यात येत आहे.

सदरच्या मागण्यानुसार ग्रामस्थांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत तिने काम न केल्यास संगमेश्वर पंचायत समितीच्या घरामध्ये आंदोलन करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर विषयांमध्ये लक्ष घालून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काम करण्यात यावे अशी ग्रामस्थांनी चे मागणी आहे.