आयपीएल 2023…
हैदराबादचा राजस्थान रॉयल्सवर विजय

Spread the love

८ मे/ जयपूर– आयपीएल २०२३ चा ५२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानात रंगला. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. कमालीचा फॉर्मात असलेल्या यशस्वी जैस्वालने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. जैस्वाल ३५ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि जॉस बटलरने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे राजस्थानने २० षटकात २ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर विजयासाठी धावांचा पाठलाग करणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. शेवटच्या षटकात १७ धावांची आवश्यकता असताना अब्दुस समदने अप्रतिम फलंदाजी केली अन् हैद्राबादने या सामन्यात विजय संपादन केलं. संदीप शर्माने फेकलेला नो बॉल हैद्राबादच्या विजयाचा केंद्रबिंदू ठरला. शेवटच्या षटकात समदने षटकार ठोकून हैद्राबादला विजय मिळवून दिला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page