जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनाचा भीषण अपघात, १ जवान शहीद, ६ जखमी
जम्मू-काश्मिर- जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात आज रविवारी एक भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये एक जवान शहीद झाला, तर ६ जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हा अपघात पूंछच्या मनकोट सेक्टरमध्ये घडला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याने बीएसएफचा एक जवान शहीद झाला. तर इतर सहाजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जखमींना जवळच्या आर्मी मेडिकल कॅम्पमध्ये दाखल करण्यात आले. येथे चार जवान गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. बीएसएफने या घटनेबाबत सांगितले की, पूंछ जिल्ह्यातील मानकोटे सेक्टरमध्ये बीएसएफच्या वाहनाला झालेल्या अपघातात एक बीएसएफ जवान शहीद झाला आणि सहाजण जखमी झाले आहेत.