मुलीच्या आक्रोशाने सर्वांना रडवले:‘पापा… तुम्ही उठत का नाही, प्लीज परत या ना, मला काहीच नकोय…’

Spread the love

जम्मू- 10 तासांपूर्वी शहीद नीलम सिंह यांचा ७ वर्षांचा मुलगा अंकित सुन्न मनाने पित्याच्या पार्थिवाकडे एकटक पाहत होता. नीलम यांचे वडील हरदेव सिंह म्हणाले, माझा मुलगाशूर जवान होता,त्याच्याहौतात्म्याचा अभिमान आहे.

शहीद नीलम सिंह यांचा ७ वर्षांचा मुलगा अंकित सुन्न मनाने पित्याच्या पार्थिवाकडे एकटक पाहत होता. नीलम यांचे वडील हरदेव सिंह म्हणाले, माझा मुलगा शूर जवान होता, त्याच्या हौतात्म्याचा अभिमान आहे.
शहीद हवालदार नीलम सिंह यांचे गाव दलपत चकमधील शांत वातावरण शनिवारी त्यांची १० वर्षांची मुलगी पवनाच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशाने सुन्न हाेऊन गेले होते. वडिलांचे पार्थिव बघून पवनाचा अश्रूंचा बांध फुटला. ‘पापा तुम्ही उठत का नाहीय? प्लीज तुम्ही परत या, मला आणखी काहीच नको आहे.’ पवनाजवळच उभी तिची आई वंदना नि:शब्द झाल्या होत्या. त्यांना पती नीलम या जगात नाहीत, यावर विश्वासच बसत नव्हता. वंदनांनी शहीद पती नीलम यांचा चेहरा हातात घेत त्यांना अखेरचा निरोप दिला.

राजौरीतील कंडी गावात शुक्रवारी अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या ५ जवानांमध्ये नीलम सिंह होते. या अतिरेकी हल्ल्यात हिमाचल प्रदेशचे अरविंदकुमार व प्रमोद नेगी, उत्तराखंडचे रुचिन सिंह रावत आणि पश्चिम बंगालचे सिद्धांत छेत्री हेसुद्धा शहीद झाले आहेत.

ऑपरेशन त्रिनेत्र : राजौरीमध्ये एका अतिरेक्याचा खात्मा; राजनाथ म्हणाले-धीर धरा, यश मिळेल.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शनिवारी राजौरीत दाखल झाले. ते सैनिकांना म्हणाले, धीर धरा, आपल्याला नक्कीच यश मिळेल. लष्करप्रमुख मनोज पांडे हेदेखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान, लष्कराने ऑपरेशन त्रिनेत्रअंतर्गत शनिवारी राजौरीतील कंडी भागात एका अतिरेक्याचा खात्मा केला. त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रेही जप्त केली. बारामुल्लातही सुरक्षा दलांनी चकमकीत एका अतिरेक्याला ठार केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page