पाच पराभवानंतर मुंबई डेंजर झोनमध्ये; प्ले ऑफमध्ये स्थान निश्चितीसाठी उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील

Spread the love

चेन्नई : मुंबई इंडियन्सचा आजच्या सामन्यात हा पाचवा पराभव ठरला. त्यामुळे आता आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ पोहोचू शकतो का, अशी चर्चा सुरु झाली आहे. मुंबई आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कसा पोहोचू शकतो याचे समीकरण आता समोर आले आहे.

मुंबईचा चेन्नईकडून झालेला हा पाचवा पराभव होता. आतापर्यंत मुंबईचा संघ १० सामने खेळला आहे. या १० सामन्यांसह मुंबईच्या संघाने पाच सामन्यांत विजय मिळवला आहे, तर त्यांना पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता पाच विजयांसह मुंबईचे १० गुण झाले आहेत. या १० गुणांसह मुंबईचा संघ आता सहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या गुणतालिकेत चार संघ १० या गुणासह आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ हा सध्याच्या घडीला डेंजर झोनमध्ये आहे. त्यामुळे मुंबईची प्ले ऑफची वाट बिकट दिसत असली तरी तरी त्यांना बाद फेरीत जाणे अशक्य नक्कीच नाही. पण त्यासाठी मुंबईला आता काय करावं लागेल, याचे समीकरण तयार झाले आहे.

या आयपीएलमध्ये प्रत्येक संघ १४ सामने खेळणार आहे. मुंबईचे आतापर्यंत १० सामने झाले आहेत, म्हणजेच अजून त्यांचे चार सामने बाकी आहेत. यामधील सात सामने त्यांच्या घरच्या मैदानात होतील तर अन्य सात सामने हे त्यांना प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात खेळावे लागतील. आता चार सामने शिल्लक आहेत. या चारमधील त्यांना किमान तीन तरी सामने जिंकावे लागतील. कारण जर तीन सामने ते जिंकले तर त्यांचे १६ गुण होतील आणि त्यांच्यासाठी प्ले ऑफचे दार उघडले जाऊ शकते. पण १६ गुण झाल्यावर त्यांचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित नसेल. जर मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमधील स्थान निश्चित करायचे असेल तर त्यांना यापुढील चारही सामने जिंकावे लागतील. चार सामने ते जिंकले तर त्यांचे १८ गुण होतील आणि त्यांचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित होऊ शकेल.

मुंबईत सामना जिंकला आणि बंगळुरुत फटाके फुटले; स्वतःसाठी जमलं नाही ते आरसीबीसाठी केलं

मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यासाठी आता एक समीकरण पुढे आले आहे. त्यानुसार मुंबई खेळली तरच ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page