कोकणी बांधव हो म्हणत नाही, तोपर्यंत रिफायनरी होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे यांची महाडमधील सभेत घोषणा

Spread the love

रत्नागिरी- बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी महाडमध्ये केली मोठी घोषणा; सरकारला इशारा देत म्हणाले…
माझं एक पत्र फडकवलं जातं, उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं. होय, उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं होतं, हे जाहीर सांगतो. कारण मी पापच केलं नाही. गद्दार नाचत आहे, उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन. कारण जागा विकली आहे, मलिदा खाल्ला आहे. यादी काढली, त्यात उपऱ्याची धन झाली आहे, अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच, कोकणी बांधव हो म्हणत नाही, तोपर्यंत प्रकल्प होऊ देणार नाही, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. ते महाडमधील सभेत बोलत होते.

“आपलं सरकार पाडलं आणि सहमती आली. कारण, मी ठरवलं होतं, अंतिम मंजुरीसाठी स्वत: तिथे जात लोकांशी बोलेन. हो बोलले तर प्रकल्प येईल. नाही म्हणाले तर कंपनीस निघण्यास सांगेल. मात्र, संपूर्ण महाराष्ट्राचं पोलीस दल बारसूत उतरवलं आहे. घरात, गच्चीत, बाल्कनीत आणि बाथरूममध्येही पोलीस गेले असतील. पण, एवढे पोलीस चीनच्या सीमेवर लावले असते, तर चीन घुसला नसता,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर केला आहे.

“केंद्रात बसलेले नेभळट चीनबद्दल एक शब्द काढत नाही. बारसूतील कोकणी भूमिपुत्रावर लाठ्या चालवत अश्रूधुर सोडत आहे. प्रकल्प सोन्यासारखा असेल, तर लाठ्या का चालवत आहात? आज जिकडे बंदी करत आहात, रिफायनरी आल्यावर प्रवेश कसा करून देणार आहात? त्यामुळे प्रकल्प होऊन देणार नाही. कोकणी बांधव हो म्हणत नाही, तोपर्यंत प्रकल्प होणार नाही. मग, कोणाच्या कितीही पिढ्या बारसूत उतरुद्या,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“हा महाड मतदारसंघ आपला आहे. केवळ निवडणुकीपुरता नाही. भगव्याला कलंक लावण्याची कोणाची हिंमत नाही. इकडे जशी मतं आहेत, तशी पवित्र मातीही आहेत,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page