
केरळ : केरळ राज्यातील (Kerala Incident) मलप्पुरम जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. तनूरजवळ पर्यटकांची बोट उलटून (boat capsized in river) भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्य तातडीने सुरु करण्यात आले आहे. अद्यापही त्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
या बोटीत 40 प्रवासी असल्याची माहिती दिली जात आहे. यामध्ये सध्या 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. प्रवाशांना वाचवण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या अपघातावर दु:ख व्यक्त केले.