
नीरज पुन्हा एकदा ९०० मीटरचा अडथळा पार करण्यात अयशस्वी ठरला. मात्र पदक जिंकून त्याने सर्वांची मनं जिंकली.
नीरज चोप्रा ने पटकावला ‘दोहा डायमंड लीग’चा खिताब
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. शुक्रवार ५ मे २०२३ रोजी दोहा डायमंड लीगच्या विजेतेपदावर त्याने आपलं नाव नोंदलं आहे. नीरज ने नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली आहे. दोहाच्या कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरजनं (Neeraj Chopra) पहिल्याच प्रयत्नात ८८.६७ मीटरवर भाला फेकला. नीरजचा हा पहिला फेक स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरला. नीरज पुन्हा एकदा ९०० मीटरचा अडथळा पार करण्यात अयशस्वी ठरला. मात्र पदक जिंकून त्याने सर्वांची मनं जिंकली. (Neeraj Chopra)
दोहा डायमंड लीगमधली नीरज चोप्राची (Neeraj Chopra) कामगिरी :
पहिला प्रयत्न : ८८.६७ मीटर
दुसरा प्रयत्न : ८६.०४ मीटर
तिसरा प्रयत्न : ८५.४७ मीटर
चौथा प्रयत्न : फाउल
पाचवा प्रयत्न : ८४.३७ मीटर
सहावा प्रयत्न : ८६.५२ मीटर
२०१८ मध्ये झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने चौथा क्रमांक पटकावला होता.