
मुंबई- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीमध्येही एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठक घेऊन शरद पवारांचा निवृत्तीचा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर आता समितीचा निर्णय शरद पवार मान्य करणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीमध्येही एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठक घेऊन शरद पवारांचा निवृत्तीचा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर समितीचा निर्णय शरद पवार मान्य करणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांचा निवृत्तीचा प्रस्ताव फेटाळण्याची माहिती खासदार प्रफुल पटेल यांनी ट्विट करून दिली. प्रफुल पटेल म्हणाले, ‘ 2 मे रोजी वाय. बी. सेंटरला शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी त्यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती’. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा केली होती. त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी कुणावर सोपवावी त्यासाठी एक समिती नेमली होती. त्यांनीच सूचवले होते’, असेही पटेल यांनी सांगितले.
त्यादिवशी त्यांच्या भाषणात भावना व्यक्त केल्या. आम्ही सगळे जण स्तब्ध झालो. आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. पवारसाहेब असा निर्णय जाहीर करतील हे कुणाला ठाऊक नव्हते. तुम्ही सगळे तिथे होते. जे काही चव्हाण सेंटरच्या सभागृहात पाहिले सगळ्यांची भावना सगळ्यांनी व्यक्त केली’, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. ते मांडण्याचा प्रयत्न केला. चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतरही माझ्यासारखे अनेक पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर यांनी पवार साहेबांची भेट घेतली. वारंवार भेटले. आणि आम्ही त्यांना सांगितले की, त्या दिवसापासून विनंती करत राहिलो. साहेब, देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची खूप गरज आहे. या पक्षाचा आधार तुम्हीच आहात असे सांगितले, असेही पटेल म्हणाले. ते मांडण्याचा प्रयत्न केला. चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतरही माझ्यासारखे अनेक पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर यांनी पवार साहेबांची भेट घेतली. वारंवार भेटले. आणि आम्ही त्यांना सांगितले की, त्या दिवसापासून विनंती करत राहिलो. साहेब, देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची खूप गरज आहे. या पक्षाचा आधार तुम्हीच आहात असे सांगितले, असेही पटेल म्हणाले.
‘राष्ट्रवादीच नव्हे, तर पक्षाबाहेरचे अनेक नेतेही म्हणतात की साहेबांनी अध्यक्षपद सोडू नये असे मत व्यक्त केले. कार्यकर्त्यांचीही तीव्र भावनाही बघायला मिळाली. आणि आज जितके लोक बाहेर आहेत. अख्ख्या महाराष्ट्रासह देशात जिथे जिथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असेही पुढे पटेल यांनी सांगितले. त्यांच्या मनात वेदना दुःख आहे. या भावनांकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. पवार साहेबांनी जो काही निर्णय घेतला. त्यावेळी याबाबतची कोणताही पूर्वकल्पना दिली नाही. कमिटीवर जबाबदारी दिली होती. बैठक बोलावली. राज्याबाहेरचे पक्षाचे नेतेही या समितीत आहेत. अध्यक्षपदी शरद पवारांनीच राहावं, असा ठराव आम्ही पारित केला आहे, असेही पटेल पुढे म्हणाले. आम्ही ठराव मंजूर केला आहे. हा ठराव घेऊन पवार साहेबांना भेटायचा प्रयत्न करू. आमच्या प्रस्तावासंदर्भात आम्ही भेटून विनंती करण्याचे काम करू. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून, त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे, असे पटेल यांनी पुढे सांगितले.