खेड :- मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे नजीक शिंदेवाडी येथे मंगळवारी सकाळी ८.५० वाजण्याच्या सुमारास एका कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने एका दुचाकीसह बस स्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक देऊन अपघात केला . यामध्ये ६ जण जखमी झाले .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल राजाराम निवाते ( वय १४ ) सुसेरी , वैष्णवी राजाराम निवाते ( वय -१८ ) सुसेरी , राजाराम शांताराम निवाते ( वय ४५ ) सुसेरी , शरद राघू देवकर ( वय वाकवली , तेजस मोहन ६२ ) दळवी ( वय २२ ) खवटी , अजित दळवी ( वय ३५ ) खवटी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत . यातील कार ही मुंबईकडून खेडच्या दिशेने येत होती . गाडी क्रमांक एम एच ४७ ए वाय ८६४२ या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरणे शिंदेवाडी बस स्टॉपवर उभे असणारे प्रवाशी व मोटार सायकल क्रमांक एम एच ०८ एल ६९४७ या दुचाकीला पाठीमागून धडक देऊन या कार चालकाने अपघात केला . भरणे नाका ब्रिज खाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्था नाणीजधामचे रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांना घटनेची माहिती मिळतच त्यांनी घटनास्थळी पोहोचून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल केले .