जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरूख | मे ०३, २०२३.
हातिव गावातील सौ. रुपाली कदम यांच्या संकल्पनेतून शिवप्रताप प्रतिष्ठान हातिव व हातिव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने शांतिदूत मर्दानी आखाडा शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर (प्रशिक्षक अतुल शिंदे) यांच्या मार्गदर्शनाने 25 एप्रिल ते 2 मे असा आठ दिवस रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच हातिव येथे शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणेत आले होते.
यामध्ये उत्तम समन्वय तालुक्यातील सर्व स्तरातील जवळपास 50 हुन अधिक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत प्रशिक्षण घेतले. या शिबिरामध्ये शिवकालीन युध्द कला व मुलींना स्वसंरक्षण, तसेच लाठीकाठी, फरीगदगा, तलवार चालवणे, दांडपट्टा, आगीतील काठी फिरवणे आदी साहशी खेळांचे व प्रशिक्षण देण्यात आले.
शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षणाची उत्कृष्ट संकल्पना ज्यांच्या मनामध्ये आली आणि आज सत्यात उतरली त्या सौ.रूपाली कदम व रूपेश कदम यांचे शिवप्रेमींनी आभार मानले. तसेच सर्व शिवकला प्रेमी विद्यार्थी व पालक वर्गाचे आयोजकांनी आभार मानले.
शिवकालीन युध्द कला प्रशिक्षणाच्या सांगता समारंभ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चौगुले. युयुत्सु आर्ते व माजी जिप अध्यक्षा सौ. रश्मीताई कदम,माजी सैनिक अमर चाळके, सरपंच नंदकुमार कदम यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मान्यवरांकडुन विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देउन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमासाठी पालक, ग्रामस्थ व शिवप्रेमी उपस्थित होते.