▪️रत्नागिरी : इयत्ता दहावी/बारावीच्या विद्यार्थ्यासाठी शासनाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर 06 मे 2023 रोजी सकाळी 09 ते 12 वाजता या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाटयगृह, मारुती मंदीर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे.
▪️या शिबिराचे उदघाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
▪️शिबिरामध्ये “दहावी व बारावी नंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी” या विषयावर शासनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात दहावी व बारावीचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजनांची माहिती तसेच करिअर प्रदर्शने याबाबत विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत.
👉🏻 *तरी या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांनी केले आहे.