
ठाणे (सचिन ठिक) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि खासदार डाँ.श्रीकांत शिंदे यांनी दिवा शहरासाठी पाच वर्षात खूप मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. दिवेकरांच्या अडीअडचणीत नेहमीच ते उभे राहीले.आज दिवा शहर जो उभा आहे.तसेच सर्वसामान्य दिवेकर नागरिक जे राहत आहेत त्यांच्यासोबत प्रत्येक वेळी सुविधा असतील किंवा संकटे असतील एकनाथ शिंदे साहेब किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब हे घरचा कर्ता पुरुष म्हणून उभे राहीलेले आहेत अश्या प्रतिक्रिया ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दियातील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभुमीवर पुर्वतयारी करीत असताना दिल्या आहेत.

बऱ्याच वर्षांनी खासकरुन मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांच्या दिवा भेटीनंतर खुद्द ठाण्यातील मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळत असलेले श्री एकनाथ शिंदे हे येत्या 7 जून रोजी दिव्यात विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भुमीपूजन सोहळ्यानिमीत्त येत आहेत.त्याची पुर्व तयारी म्हणून ज्या ठिकाणावर मोठी सभा होणार आहे त्याठिकाणी माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिव्यातील विविध विकास कामांसाठी घेतलेली दखल,केलेली मदत आणि लोकार्पण आणि भुमीपूजन सोहळ्याची रुपरेषा बोलून दाखविली.
मढवी पुढे म्हणाले की,खिडकाळेश्वर येथे असलेल्या पुरातन शिवमंदीराच्या सुशोभिकरणासाठी 10 कोटी,18 लाख खर्चाच्या कामाचे भुमीपुजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.तसेच 15 कोटींचे आगरी कोळी आणि वारकरी भवन दिव्यात उभे राहणार आहे.दिवा शहरातील महत्वाची असलेली पाणी योजना 221 कोटींचे असून त्या मुख्य जलवाहीनीचे भुमीपूजन होणार आहे.ही मुख्य जलवाहीनी पलावा ते दिवा चौक इथपर्यंत येवून दिवेकरांची पाण्याची वणवण कायमची दुर होणार आहे. दिव्यात आरोग्य केंद्र,सामाजिक भवन,उड्डान पुलं,शाळा आदींसह अनेक कामांचे लोकार्पणनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान दिव्यात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे.येत्या 7 जूनला कार्यक्रम असल्यामुळे शिवसेनेचे आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी दिवा भगवामय करण्यास सुरुवात केली आहे.तसेच या सभेला जवळपास 20 हजारापेक्षा जास्त नागरिक जमा होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.