तिरुवनंतपुरम- काँग्रेसच्या ‘घर-घर गॅरंटी’ मोहिमेअंतर्गत राहुल गांधी यांनी बुधवारी वायनाडमध्ये प्रचार केला. काँग्रेसच्या ‘घर-घर गॅरंटी’ मोहिमेअंतर्गत राहुल गांधी यांनी बुधवारी वायनाडमध्ये प्रचार केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल यांनी उमेदवारी अर्जात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण 20.39 कोटी रुपयांची संपत्ती आहे. गेल्या पाच वर्षांत ही ५.५४ कोटींची वाढ आहे. त्यात 9.24 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 11.15 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. राहुलकडे ५५ हजार रुपये रोख आहेत. गेल्या एका वर्षात त्यांनी 1.02 कोटी रुपयांची कमाई केली. त्यांच्याकडे बँकेत 26.25 लाख रुपये जमा आहेत.
फंडात 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्याशिवाय यंग इंडियनचे 1.90 लाख रुपये किंमतीचे 1900 शेअर्स आहेत. 15.21 लाख रुपये गोल्ड बाँडमध्ये गुंतवले आहेत. 4.2 लाख रुपयांचे दागिनेही आहेत. एवढेच नाही तर एनएसएस, पोस्टातील बचत आणि विमा पॉलिसीमध्ये सुमारे 61.52 लाख रुपये जमा आहेत. राहुल आणि बहीण प्रियंका गांधी यांच्या संयुक्त नावावर सुलतानपूर, यूपीमध्ये शेतजमीन आहे. यात त्यांचा हिस्सा २.३४६ एकर शेती आणि १.४३२ एकरचा भूखंड आहे. या स्थावर मालमत्तेची किंमत 2.10 कोटी रुपये आहे. गुरुग्राममधील कार्यालयाच्या जागेची सध्याची किंमत 9.04 कोटी रुपये आहे.
शपथपत्रात १८ गुन्हे-खटल्यांचा उल्लेख…
राहुल यांनी शपथपत्रात १८ गुन्हे-खटल्यांचा उल्लेख केला आहे.यात मानहानी खटल्यात सुरत न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेचाही उल्लेख आहे. २०१९ मधील शपथपत्रात त्यांनी ६ खटले असल्याचे नमूद केले होते.