रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या पथकाकडून सोमवारपासून थकीत करदारांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. घरपट्टीचे सुमारे १० कोटी रुपये वसुलीचे लक्ष आहे. सोमवार १३ मार्च रोजी पहिल्याच दिवशी थकीत करदात्यांच्या ४८ मालमत्ता सील करण्यात आल्या तर पाणीपट्टी थकीत असलेल्यांच्या २२ नळजोडण्या तोडण्याची कारवाई न.प. प्रशासनामार्फत करण्यात आली.
रत्नागिरी नगर परिषदेची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. रत्नागिरी शहराीतल नगर परिषद हद्दीतील घरपट्टी थकवणार्यांच्या मालमत्ता जप्त करणे आणि पाणीपट्टी न भरणार्यांच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही कारवाई मोहीम ३ वेगवेगळ्या पथकांमार्फत सुरू झाली आहे.