
मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)
एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जो पक्ष बाळासाहेबांनी लाखो शिवसैनिकांनी बलिदान देऊन मोठा केला.
तो पक्ष ४० बाजारबुणगे विकत घेतात. यावर काय बोलावं, लोकशाहीवरचा विश्वास आज गमावला आहे.देशातील सगळ्या स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. न्यायव्यवस्था देखील गुलाम असल्यासारखं वागत आहेत.
४० बाजारबुणगे हे पैशांच्या जोरावर पक्ष विकत घेत असतील सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे. काही झाले ते सगळे दबाबातून झाले आहे. असे मला वाटते. निवडणूक आयोगावर माझा विश्वास नाही. जो निर्णय आला आहे तो विकत घेतलेला आहे. खोके सरकार त्यांनी हे सगळे केले आहे. त्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. आम्ही पुन्हा कायद्याची लढाई लढणार आणि नवी शिवसेना उभारणार.
सगळ्या संस्था आता सरकारच्या गुलाम झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा लढाई लढणार आहे.
जाहिरात :

