टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील तिसरा दिवस हा पाहुण्यांच्या नावावर राहिला. इंग्लंडने जोरदार कमबॅक करत टीम इंडियावर दबाव तयार केलाय.
हैदराबाद- टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. सलग 2 दिवस आपल्या नावावर करणाऱ्या टीम इंडियाला इंग्लंडने मागे टाकत तिसरा दिवस आपल्या नावावर केला आहे. इंग्लंड ओली पोप याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर 126 धावांची मजबूत आघाडी घेत भक्कम स्थितीत पोहचली आहे. तर ओली पोप याच्या खेळीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
इंग्लंडने दुसऱ्या डावात 77 ओव्हरमध्ये 316 धावा केल्या आहेत. ओली पोप आणि रेहान अहमद ही जोडी नाबाद परतली. ओली पोप 208 चेंडूमध्ये 17 चौकारांसह 148 धावांवर नाबाद आहे. तर रेहान अहमद याने नॉट आऊट 16 रन्स केल्या आहेत. इंग्लंडकडून या दोघांव्यतिरिक्त बेन डकेट याने 47, बेन फोक्स याने 34, झॅक क्रॉली 31, जॉनी बेयरस्टो 10, कॅप्टन बेन स्टोक्स 6 आणि जो रुट याने 2 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि रवीचंद्रन अश्विन या दोघांनी आतापर्यंत 2-2 विकेट्स घेतल्यात. तर अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा याने 1-1 विकेट घेतलीय.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 246 वर ऑलआऊट केलं. त्यानंतर पहिल्या डावात 436 धावांपर्यंत मजल मारत 190 ची भक्कम आघाडी घेतली. यात टीम इंडियाकडून तिघांनी 80 पेक्षा अधिक धावांची खेळी केली. यामध्ये रवींद्र जडेजा 87, केएल राहुल याने 86 आणि यशस्वी जयस्वाल याने 80 धावा केल्या. तर इतरांनी छोटेखानी खेळी करत चांगली साथ दिली.
इंग्लंडला रोखण्याचं आव्हान…
दरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला चौथ्या दिवशी झटपट रोखण्याचं आव्हान असणार आहे. इंग्लंडने 6 विकेट्स गमावून 126 धावांची आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाचे गोलंदाज इंग्लंडला किती धावांपर्यंत रोखतात, हे सामन्याच्या निकालाच्या हिशोबाने निर्णायक ठरणार आहे.
तिसरा दिवस इंग्लंडचा…
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन-
बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.