च्यवनप्राश, हाजमोला तयार करणाऱ्या कंपनीला ३२० कोटी रुपयांची टॅक्स नोटीस

Spread the love

मुंबई :- हाजमोला, च्यवनप्राश, मध, केसांचे तेल इत्यादी अनेक उत्पादने बनवणाऱ्या डाबर या देशातील सर्वात मोठ्या एफएमसी कंपन्यांपैकी एका कंपनीला मोठा धक्का बसला आहे. दैनंदिन वापराच्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपनीला जीएसटी नोटीस मिळाली आहे. तब्बल ३२० कोटी रुपयांची ही नोटीस आहे. खुद्द डाबर इंडियानं ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. संबंधित अथॉरिटीमध्ये या नोटीसला आव्हान देण्यात येणार असल्याचं डाबर इंडियानं शेअर बाजाराला सांगितलं.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार डाबरला सीजीएसटी अधिनियम २०१७ च्या कलम ७४(५) अंतर्गत टॅक्सची नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये जीएसटीच्या रुपात ३२०.६० कोटी रुपये व्याज आणि दंडासह भरण्यास सांगण्यात आलंय. असं न केल्यानं कारणे द्या नोटीसही बजावण्यात आलीये. परंतु जीएसटीच्या मागणीमुळे कंपनीच्या आर्थिक आणि अन्य कोणत्याही कामकाजावर परिणाम होणार नसल्याचं डाबरनं म्हटलंय. १६ ऑक्टोबरला जीएसटी इंटेलिजन्स डायरेक्ट्रेटच्या (डीजीजीआय) गुरुग्राम झोनल युनिटकडून ही नोटीस जारी करण्यात आली.
पहिल्या तिमाहित इतकी कमाई
डाबरनं अतापर्यंत जुलै-सप्टेंबर या कालावधीदरम्यानचे तिमाहिचे निकाल जाहीर केले आहे. विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित कंपनीचं नेट प्रॉफिट ३.५ टक्क्यांनी वाढून ४५६.६ कोटी रुपये होतं. एका वर्षापूर्वी या कालावधीत ते ४४१ कोटी रुपये होते. याच कालावधीत कंपनीचा महसूल ११ टक्क्यांनी वाढून २,८२२.४ कोटी रुपयांवरून वाढून ३१३०.५ कोटी रुपये झालं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page