
*देवरूख:-* संगमेश्वर तालुक्यात एक जिप गट व दोन पंचायत समिती गण असे तीन अर्ज दाखल केले आहेत.
संगमेश्वर तालुक्यात महायुती झाली असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असुन भाजपाच्या वाट्याला कडवई व साडवली हे दोन जिप गट आले आहेत.पस गणातील जागाबाबतीत अजून अंतिम फैसला झालेला नाही.
सोमवारी भाजपचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांच्या पत्नी सौ. रुपाली कदम यांनी साडवली गटातून भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर निवे बु! पं. स. गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रफुल्ल बाईत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर साडवली गणातून सौ. तृप्ती सचिन मांगले यांनी शिवसेनेच्यावतीने अर्ज दाखल केला आहे.
शिवसेनेने कसबा, नावडी या गटातून अनुक्रमे माजी जिप अध्यक्ष रचना महाडीक, माधवी गीते यांना तर परचुरी गणातून पूनम महेश देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*