दैनिक अग्रलेख सोबत रेडलाईटची पर्वणी

मुंबई (शांताराम गुडेकर )
शहापूर येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक अग्रलेख वर्तमानपत्राच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्ताने व कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारे ग्रामीण कला मंच दहाव्या वर्षात पर्धापन केले म्हणून त्यानिमित्ताने ग्रामीण कला मंच ,लेखक/निर्माता/दिग्दर्शक/ उमेश मारुती भेरे प्रस्तुत पांढरपेशाच्या वासनांध महत्वकांक्षेचा बळी ठरणाऱ्या वेश्या वस्तीची करून कहाणी सांगणारे दोन अंकी” नाटक रेड लाइट “या नवीन नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोगआणि दै. अग्रलेख वर्धापन दिन सोमवार दि.२४ एप्रिल २०२३ रोजी कल्याण येथील प्रसिद्ध असलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे पार पडला.
वर्धापन दिन कार्यक्रमला जेष्ठ पत्रकार विजयकुमार बांदल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव काशिनाथ तिवरे,अभिनेते दीपक खांडेकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेशकुमार धानके,शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विनायक सापळे,भारतीय मानव विकास सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश घेगडे,शिक्षण तज्ञ पद्मिनी कृष्णा,सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे ,रमाबाई ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योतिताई गायकवाड,आपला चौथा स्तंभचे उपाध्यक्ष अशोक सांगळे व प्रीती बने,कोकण पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक बोराडे,ओबीसी महासंघाचे कोकण अध्यक्ष एकनाथ तारमळे ,लोकशाही वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अनिल घोडविंदे,पत्रकार राजेंद्र माने तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मित्रांनो….! आपण रंडी, छिनाल,बाजारी,हे शब्दप्रयोग ऐकले,वाचले किंवा बोलले असू….पण अशा शब्दांत ज्यांना संबोधिले जाते,अशा भगिनींची व्यथा आजही कुणा कळली नाही,स्त्री-जन्म आजही कुणा कळला नाही…त्या स्त्रीची इच्छा नसताना देखील त्यांच्यावर होणारे वारंवार बलात्कार,समाजातील ही एक घातक कीड आहे.मग त्या वरील शब्दप्रयोग करणाऱ्या त्या स्त्रीया आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतात,पण त्यांचं तिथले राहणीमान, त्यांना अशा व्यवसायात पडण्याचे कारण आणि त्यांचं जीवनमान खऱ्या अर्थाने उमेश मारुती भेरे लिखित/दिग्दर्शित – रेड लाईट ही दोन अंकी नाट्यकृती पाहिलात तर सारा भावार्थ डोळ्यासमोर उभा राहील…मी आजची नाट्यकृती पाहिली, लेखकाने एका भावनिक,सामाजिक विषयाला आपल्या कुशल लेखणीतून हात घातला आहे,हे साऱ्या नाट्य श्रोत्यांनी पाहिलं….त्याला हवा तसा प्रतिसादही मिळाला.
संपादक श्री.उमेशजी भेरे व त्यांच्या संपादकीय टीम, सर्व कर्मचारी वर्ग तसेच नाटक मधील सर्व टीमची मेहनत या नाटकाद्वारे दिसून आली.प्रत्येक कलाकाराचा अभिनय हा जातिवंत दाद देणारा होता.नाटकाच्या सुरुवातच वेश्या वस्तीतील दृश्यातून झाली,वेश्या वस्तीतील ते हुबेहूब चित्र रेखाटण्याचा उत्तम प्रयत्न या नाटकाद्वारे करण्यात आला.वेश्या वस्तीत येणारी तरुणी,महिला ही स्वतःची हौस म्हणून येत नसते तर त्यामागे पण एक मोठी करूण कहाणी असते ही वास्तविकता दाखवणारे हुबेहूब चित्रण भेरे सरांच्या रेडलाईट या नाटकाद्वारे रेखाटण्याचा प्रयत्न केला गेला आहे.नाटकातील प्रत्येक कलाकाराचा अभिनय हा दाद देणारा आहे.मुख्य भूमिकेतील डॉ. सोनाली म्हाळसाने असो की नितीन गाडेकर, दिव्या शिर्के ,प्रसाद वैद्य, सर्वांचाच अभिनय उत्तरोत्तर फुलत चालला होता याची प्रचिती येते.उमेश भेरे सर यांच्या पत्नी यांनी या नाटकासाठी प्रत्येक कलाकारास दिलेली वेशभूषा प्रेक्षकांचे मन वेधून घेणारी होती. तर रंगभूषा मिलिंद कोचरेकर यांची सर्व काही उत्तमच होते.एकंदरीत एक अप्रतिम नाटक पाहण्याची संधी यनिमित्ताने असंख्य नाट्यप्रेमी प्रेक्षकांना, पत्रकार मंडळींना मिळाली.यावेळी शहापुर तालुक्यातून अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.त्यांचाही दैनिक अग्रलेख व कलामंच कडून यथोचित सन्मान करण्यात आला.उमेशजी भेरे सरांच्या या रेडलाईट नाटकाचे आणखी प्रयोग पार पडावेत या शुभेच्छा सह त्यांना व त्यांच्या संपूर्ण टीमला अनेकांकडून यनिमित्ताने भावी वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.