मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव कंटेनरने चार वाहनांना उडवले; २ ठार चार जखमी

Spread the love

पुणे ,21 ऑगस्ट- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनर उलटून झालेल्या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना अफकॉन कार्यालयाजवळ, ढेकू गावाजवळ घडली.

या अपघातात एक कंटेनर ट्रक क्रॅश बॅरिअर आणि डिव्हायडरवर आदळला. त्यानंतर पुणे-कडे जाणार्‍या लेनवर तब्बल तीन ते चार भरधाव कार या कंटेनरला धडकल्या. हा अपघात आज सकाळी सकाळी ९.३० च्या सुमारास झाला. अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जखमींना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page