🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 सातारा | जानेवारी ३१, २०२३.
◼️ साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्यात कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
◼️ या विषयी अधिक माहिती अशी की, पुण्यातील सराफ कुटुंबीय गोकर्ण, महाबळेश्वरची ट्रीप संपवून पुन्हा पुण्याला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना शिरवळच्या जोगळेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.