इस्रायल ने दक्षिण गाझातील राफा शहरावर शनिवारी रात्रभर हल्ला केला. या हल्ल्यात 14 मुलांसह 18 व्यक्ती ठार झाल्यास गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिका इस्रायलला अब्जावधी डॉलरची अतिरिक्त लष्करी मदत करण्याची तयारी करत आहे.
संकटग्रस्त गाझा परिसरातील 23 लाख लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकांनी आश्रय घेतलेल्या इजिप्त च्या सीमेजवळील राफा शहरावर इस्रायल दररोज हवाई हल्ले करत आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी इस्रायलला संयम बाळगण्याचे आवाहन करूनही या शहरावरील इस्रायलचे लष्करी हल्ले सुरूच आहेत.
इस्रायल आणि गाझा संघर्षामध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाने 26 अब्ज डॉलरचे मदत पॅकेज शनिवारी जाहीर केले यामध्ये गाझालां मानवतेच्या आधारावर नऊ अब्ज डॉलर मदत देण्याचा समावेश आहे.
इस्रायल ने राफावर केलेल्या पहिल्या हल्यात एक माणूस त्याची पत्नी आणि तीन वर्षाचा मुलगा मरण पावला आहे, यामधील महिला ही गर्भवती होती आणि डॉक्टरांनी तिच्या बाळाला मात्र वाचवले आहे. दुसऱ्या एका हल्ल्यात एकाच कुटुंबातील 13 मुलं आणि दोन महिला मारल्या गेल्या आहेत असं कुवेत रुग्णालयाने सांगितल आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्त्राईल हमास युद्धात 34 हजाराहून जास्त पॅलेस्टिनी ठार झाले असून जवळपास 80 हजार पॅलेस्टनी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये जवळपास दोन तृतीयांश महिला आणि लहान मुले होती. गाझातील दोन शहर उद्ध्वस्त झाली असून 80 टक्के लोकसंख्या घर सोडून निर्वासित झाले आहेत.