खेड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रसाळगडचा लवकरच चेहरामोहरा बदलणार आहे. किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी राज्य शासनाकडून १४ कोटी ९१ लाख ४१ हजार ९४० रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. यासाठी महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या किल्ले रसाळगडला राज्य सरकारने २००३ मध्ये संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले आहे. या किल्ल्याकडे पर्यटकांसह दुर्गप्रेमींची पावले वळत असल्याने वर्षानुवर्षे किल्ल्याचे महत्व वाढतच आहे. पावसाळ्यातील भटकंतीसह ट्रॅकर्सची पसंती असलेल्या रसाळगड किल्ला पर्यटनाचे नवे डेस्टिनेशन ठरत आहे. मात्र किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट देखील नाही. दगडांमधूनच मुख्य किल्ल्याच्या आतील भागात जावे लागते.
किल्ल्याच्या पायाभूत सेवासुविधांचा अभाव असून काही ठिकाणी पडझड देखील झाली आहे. यामुळे किल्ल्याचे वैभव काहीअंशी झाकोळले गेले आहे