महामार्ग आंदोलन प्रकरणातील मनसेच्या १४ जणांना आज न्यायालयात हजर

Spread the love

रत्नागिरी :- मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाविरोधात मनसेने सुरू केलेल्या आंदोलनानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ९७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे . तसेच मनसेचे दोन पदाधिकारी व १२ कार्यकर्ते असे एकूण १४ जणांना १८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे . त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे .
आंदोलन प्रकरणी राजापूर, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे यांनी तात्काळ कारवाई केली व आंदोलकांना ताब्यात घेतले.

एकूण ३ घटनांची नोंद

१ ) हातिवले येथील घटनेत २ आरोपी अटक करण्यात आलेले आहेत व त्यांना १ दिवस पोलिस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे.
२ ) खानू येथील घटनेत एकूण ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे व अटकेची कारवाई चालू.
३ ) पाली येथील जेसीबीवर काठीने हल्ला करून काचांची तोडफोड प्रकरणी ८आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत व अटकेची कारवाई चालू.
मनसेच्या १४ जणांना न्यायालयात आज १९ रोजी हजर करण्यात येणार आहे.
अटक करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २ पदाधिकारी व १२ कार्यकर्ते यांची यादी खालील प्रमाणे आहे.
१ ) अद्वैत सतीश कुलकर्णी, मनसे शहर अध्यक्ष, रा. अभ्युदय नगर,
२ ) अविनाश धोंडू सौंदळकर, दक्षिण जिल्हा अध्यक्ष रा. नाचणे रोड रत्नागिरी,
३ ) रुपेश श्रीकांत चव्हाण रा. कोकण नगर, रत्नागिरी,
४ ) राजू शंकर पाचकुडे रा. नरबे करबुडे,
५ ) विशाल चव्हाण रा. भोके,
६ ) अजिंक्य महादेव केसरकर रा. धवल कॉम्प्लेक्स, रत्नागिरी,
७ ) कौस्तुभ विश्वनाथ केळकर रा. कोंडगाव साखरपा, देवरुख,
८ ) सतीश चंद्रकांत खामकर रा. गणेश नगर, कुवारबाव,
९ ) सुशांत काशिनाथ घडशी रा. कारवांचीवाडी,
१० ) मनीष विलास पाथरे रा. काळाचौकी मुंबई
११ ) सुनील राजाराम साळवी, रा. नाचणे रोड रत्नागिरी.
१२ ) महेश दत्ताराम घाणेकर रा. देऊड,
१३ ) महेश गणपत घाणेकर रा. जाकादेवी
१४ ) रुपेश मोहन जाधव, रा. कोसुंभ, संगमेश्वर सध्या मारुती मंदिर रत्नागिरी.

तसेच रत्नागिरी जिल्ह्यामधून ताब्यात घेण्यात आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

दापोली ३
खेड २०
गुहागर ५
चिपळूण २२
राजापूर १४
मंडणगड २
लांजा २
देवरुख ४
रत्नागिरी ग्रामीण ०
रत्नागिरी शहर ५
संगमेश्वर ४
आलोरे १
सावर्डे ५
बाणकोट ०
जयगड ३
नाटे २
पूर्णगड ५
दाभोळ ०


एकूण ९७

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page