दहावीचा निकाल जाहीर; 135 विद्यार्थ्यांना मिळाले 100 टक्के गुण!..

Spread the love

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचं चित्र बघायला मिळतंय.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झालाय. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

यंदा राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के लागलाय. तर यावेळीही निकालात कोकण विभागानं बाजी मारलीय. 99.00 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 94 टक्क्यांसह नागपूर विभाग शेवटचा आलाय. तसंच यावेळी देखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 97.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या निकालाची टक्केवारी 94.56 टक्के असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. तसंच परीक्षेत यशस्वी न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी जुलैमधील पुरवणी परीक्षेला बसावं, असं आवाहनही यावेळी शरद गोसावी यांनी केलं. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86 टक्के इतकी आहे. तर या परीक्षेत 135 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

🔹️विभागनिहाय निकाल-

▪️पुणे – 96.44
▪️नागपूर – 94.73
▪️संभाजीनगर – 95.19
▪️मुंबई – 95.83
▪️कोल्हापूर – 97.45
▪️अमरावती – 95.58
▪️नाशिक – 95.28
▪️लातूर – 95.27
▪️कोकण – 99.01

🔹️निकालाची ठळक वैशिष्ट्य-

👉या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,60,154 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,49,326 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,84,441 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसंच त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 95.81 आहे.

👉या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 25,770 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 25,327 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 12,958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 51.16 आहे.

👉या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 25,894 खासगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 25,368 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 20,403 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.42 आहे.

👉या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 9149 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9078 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 8465 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.25 आहे.

👉या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, पुनर्परिक्षार्थी आणि खासगी मिळून एकूण 16,11,818 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16,00,021 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,17,802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.86 आहे.
एकूण 18 विषयांचा निकाल 100% टक्के लागलाय.

👉राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 5,58,021 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 5,31,822 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 3,14,866 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 79,732 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

👉राज्यातील 23,288 माध्यमिक शाळांतून 15,60,154 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,382 शाळांचा निकाल 100 टक्के लागलाय.

🔹️कुठं चेक करता येणार निकाल?…

▪️mahresult.nic.in
▪️sscresult.mahahsscboard.in
▪️sscresult.mkcl.org
▪️results.digilocker.gov.in

🔹️ऑनलाईन निकाल कसा पहावा?…

▪️निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.

▪️वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं तुम्हाला दहावीच्या निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

▪️लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आपल्या आईचं नाव टाकावं लागेल.

▪️त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यावर रिझल्ट दिसेल.

🔹️ऑनलाईन निकाल कसा पहावा?…

▪️निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.

▪️वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं तुम्हाला दहावीच्या निकालाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

▪️लिंक वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि आपल्या आईचं नाव टाकावं लागेल.

▪️त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यावर रिझल्ट दिसेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page