सावर्डे येथील श्रीराम जन्मोत्सवाला १३० वर्षांची परंपरा! ३१ मार्चपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Spread the love

चिपळूण: सावर्डे येथील कासारवाडीतील श्रीराम मंडळ यावर्षी १३० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त सोमवारपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. ३१ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी श्री सत्यनारायणाची महापूजा व रात्री हभप विजय महाराज वारे यांचे प्रवचन झाले. मंगळवारी विणापूजन कार्यक्रम पार पडला. तसेच श्रीराम जन्मोत्सव कीर्तन, ३० मार्च रोजी श्रीरामजन्म कीर्तन व रात्री श्रीराम पालखी दिंडी सोहळा, ३१ मार्च रोजी महाप्रसाद, रात्री दोनअंकी विनोदी नाटक होणार आहे.

गुढी पाडव्यापासून मंदिरामध्ये नित्य आरतीला सुरवात होते. चैत्र शुद्धषष्टी दिवशी वर्धापनदिनी सत्यनारायण महापुजेने याची सुरुवात होते. सप्तमी ते दशमी या कालावधीत विणापूजन व सप्ताह साजरा होतो. या दरम्यान आरती, भजन, कीर्तन तसेच पालखीसोहळा अशा भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. येथील स्थानिक कलाकार या नाटकात सहभागी होतात. नेपथ्य व दिग्दर्शनसुद्धा याच मंडळातील अनुभवी व्यक्तींकडून केले जाते. ३१ मार्चला रात्री १० वाजता दशरथ राणे लिखित व सावर्डे ग्रामपंचायत माजी सदस्य हरहुन्नरी कलाकार देवराज गरगटे दिग्दर्शित दोन अंकी धम्माल विनोदी नाटक ‘बायको असून देखणी’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक कलाकार सूरज बिजितकर, ओंकार डोंगरे, ओंकार पोकळे, विलास दीडपसे, सचिन पोकळे, देवराज गरगटे, गौरव वारे व मैथिली निमकर यांचा समावेश आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page