
India to win Champions Trophy 2025 : भारताच्या संघाने १२ वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद नावावर केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने आठ महिन्यांमध्ये दुसरे आयसीसी टायटल नावावर केले आहे.
दुबई- भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना झाला आहे. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे जेतेपद नावावर केले आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्वतः फलंदाजीची जबाबदारी घेऊन न्यूझीलँडच्याय्या फलंदाजांना पहिल्या ओव्हरपासून झोडपायला सुरुवात केली होती. तर शुभमन गिलने दुसऱ्या बाजूने खेळ सांभाळला. भारताच्या संघाने १२ वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद नावावर केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने आठ महिन्यांमध्ये दुसरे आयसीसी टायटल नावावर केले आहे. रोहित शर्मा हा जगातला सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याने नाव कोरले आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा १५ वा नाणेफेकमध्ये पराभव झाला. पहिले फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघाने ७ विकेट्स गमावत २५२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. यामध्ये न्यूझीलंडच्या संघासाठी डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी दोघांनी अर्धशतकीय खेळी खेळली होती. मायकेल ब्रेसवेल याने संघासाठी ५३ धावांची नाबाद खेळी खेळली. तर डॅरिल मिशेल याने संघासाठी ६३ धावा केल्या.
भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भारताचा मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्तीने कमालीची गोलंदाजी करून २ विकेट्स भारतीय संघाला मिळवून दिले. तर कुलदीप यादवने भारताच्या संघाला न्यूझीलंडच्या दोन मजबूत फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कुलदीप यादवने चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यात दोन विकेट्स घेतले. कुलदीप यादवने रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन याना बाहेर केले आणि सामना भारताच्या दिशेने वळवला. रवींद्र जडेजाने संघासाठी एक विकेट घेतला तर मोहम्मद शमीने सर्वाधिक धावा दिल्या आणि १ विकेट भारताच्या नावावर केला.
टीम इंडियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने ७६ धावांची ,महत्वाची खेळी खेळून टीम इंडियाला मजबूत सुरुवात करून दिली आणि चांगल्या स्थितीत उभे केले. भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने संघासाठी ३१ धावांची महत्वाची खेळी खेळून महत्वाचे योगदान दिले. त्यानंतर दोन्ही विकेट गमावल्यानंतर भारताचा स्टार एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाज श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा टीम इंडियाचा खेळ सांभाळला आणि भारताच्या संघासाठी महत्वाची ४८ धावांची खेळी खेळली.