साळवी स्टॉप येथे १ लाखांचे ब्राऊन हेरॉईन जप्त

Spread the love

रत्नागिरी – रत्नागिरी शहरातील चर्मालय- साळवीस्टॉप मार्गावर मोकाशी बिअर शॉपीजवळ ब्राऊन हेरॉईन विक्री करण्यासाठी तयारीत असलेल्या आरमान लियाकत धामस्कर याला शहर पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून ६.०० ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईन जप्त केले. याची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे. पोलिसांनी दुचाकीसह रोख रक्कम १ हजार २०० रु.जप्त केले आहेत.

रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस अंमलदार अमोल भोसले साळवीस्टॉप जवळ गस्त घालीत असताना त्यांना मोकाशी बिअर शॉपीजवळ आरमान धामस्कर हा ६.०० ग्रॅम वजनाचा सुमारे १ लाख रु. किंमतीचे ब्राऊन हेरॉईन घेऊन उभा होता. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक दुचाकी, रोख १ हजार २०० रु.जप्त करण्यात आले. आरमान धामस्कर याच्या विरोधात एन.डी.सी.एस्‌‍. ॲक्ट कलम ८ (क), २२ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page