संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे पंचक्रोशीतील नागरिकांना बीएसएनएल नेटवर्कवर अवलंबून रहावे लागते. मात्र मागील काही महिने सतत नेटवर्कमध्ये समस्या उद्भवत असल्याने वापरकर्त्यांच्या तक्रारीचे सूर वाढत आहेत. शाळा, खाजगी, शासकीय/निमशासकीय संस्थांची ऑनलाईन कामे करण्यासाठी या भागात बीएसएनएल नेटवर्क हा उत्तम पर्याय मानला जातो याचे कारण याव्यतिरिक्त अन्य नेटवर्क कंपन्यांनी या भागात आपली सेवा अद्याप सुरू केलेली नाही. अशातच आता बीएसएनएल नेटवर्कमध्ये अशा समस्या उद्भवत असतील तर वापरकर्त्यांनी करायचे तरी काय असा प्रश्न ग्राहकांच्या मनात आहे.
याच प्रश्नाला सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल गायकर यांनी लक्षवेधी करत बीएसएनएलच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये त्यांनी नेटवर्कमध्ये समस्या उद्भवण्याची कारणे, या समस्या निराकरणासाठी आपल्या स्तरावरून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती द्यावी अशी मागणी केली आहे. सोबतच या निवेदनावर गांभिर्याने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर आमच्या समस्येचे निराकरण करून योग्य रितीने सेवा पुरवावी अन्यथा तीव्र आंदोलन होईल असा इशारा श्री.गायकर यांनी या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
अवैद्य धंदे असो की रस्त्यांचे प्रश्न नेहमीच स्वतःच्या आक्रमक शैलीत जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम श्री.गायकर नेहमी करीत असतात.हल्लीच कोसुंब – ताम्हाणे मार्गांसाठी उपोषण छेडले होते,प्रशासनाने गांभीर्याने
दखल घेऊन 26 तारखेपर्यंत काम चालू करेन असे लेखी लिहून दिल्यावर उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. श्री.गायकर हे भाजपा पक्षाचे सोशल मिडीयाचे अध्यक्ष आहेत,तरीही कोणतेही राजकारण न आणता ताम्हाणे पंचक्रोशीतील नागरिकांच्या समस्या निपक्षीय निस्वार्थीपणे सामाजिक कार्यकर्ते म्हणून सोडविण्याचा प्रयत्न करत असतात.तालुक्यामध्ये भ्रष्ट कारभारास पायाबंद करण्यासाठी सर्वानी लोकशाहीच्या छत्राखाली एकत्र येणे गरजेचे आहे असे त्यांचे मत आहे.लवकरच ग्रामपंचायतीमधील भ्रष्ट कारभार आणि सहकार क्षेत्रातील मोठा गौप्यस्फ़ोट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
⭕ BSNL च्या भोंगळ कारभाराने ताम्हाणे पंचक्रोशीतील नागरिक कमालीचे त्रस्त…
💫 युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल गायकर यांनी घेतला आक्रमक पवित्रा…
👉 लेखी निवेदनाद्वारे दिला तीव्र आंदोलनाचा इशारा
ताम्हाणे | एप्रिल २१, २०२३.